Latest Posts

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या माजी सैनिक, विधवा, युध्द विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रथम वर्षात शिकत असलेल्या आणि २०२३-२४ मध्ये शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पाल्यांनी ३० नोव्हेबर पर्यंत www.ksb.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे. मुलांसाठी प्रतिमाह २ हजार ५०० रुपये व मुलींसाठी प्रतिमाह ३ हजार रुपये शिष्यवृत्ती लागु करण्यात आली असून शिष्यवृतीसाठी विद्यार्थ्यांना ६० टक्केच्या वर गुण असणे आवश्यक आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकिय, दंत, पशुचिकित्सा, बीएएमएस, बीएचएमएस, बीबीए, बीबीएम, बीएससी. कृषि, एमबीए, बीसीए, एमसीए, बिएड चा समावेश असणार आहे. सदर अर्ज ऑनलाईन भरुन परस्पर केंद्रीय सैनिक बोर्ड, न्यु दिल्ली यांच्याकडे पाठविणे आवश्यक आहे. ज्यांना २०२२-२३ मध्ये सदर शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्यांनी सुध्दा नुतणीकरणासाठी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सैनिक कल्याण विभागाने कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss