Latest Posts

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

– सिरोंचा तालुक्यात विविध पक्षांना खिंडार

– राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सरपंचासह राष्ट्रवादी व आविस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : मागील काही दिवसापासून माजी राज्यमंत्री तथा भाजपचे नेते राजे अम्ब्रीशराव आत्राम हे मैदानात उतरल्याने विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते राजेंच्या युवा नेतृत्वावर विश्वास करत भाजपा पक्षात जाहीर प्रवेश घेत आहेत.

जन्माष्टमी निमित्य माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम (Former Minister of State Raje Ambrishrao Atram) कालपासून सिरोंचा तालुक्यात तळ ठोकून बसले आहेत. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आज विविध कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. सिरोंचा तालुक्यातील चिटूर ग्रामपंचायतचे राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान सरपंच लचलू बंडे माडे यांच्यासह अंकीसा चेक, गोल्लागुडम, बालमुत्तमपल्ली, गेरापल्ली, चेतालपल्ली, रंगधामपेठा, लक्ष्मीदेवपेठा, पोचमपल्ली, कोत्तपल्ली, वडधम या विविध गावातील राष्ट्रवादी काँग्रेस व आविस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात काल जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत व पुष्गुच्छ देत सर्वांचे स्वागत केले.

२०१९ मध्ये अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाल्यावर ते मैदानात नसल्याची चर्चा रंगत होती. मात्र, आता या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून त्यांचे अहेरी विधानसभेतील विविध तालुक्यात वाढलेले दौरे आणि जनसंपर्क बघता युवा वर्ग काबीज करण्यात त्यांना मोठा यश मिळत आहे. यापूर्वी सुद्धा नुकतेच काही दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यातील विविध गावातील तरुण वर्ग अहेरी येथील रुख्मिणी महल येथे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची भेट घेऊन भाजप पक्षात प्रवेश केले. विशेष म्हणजे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षित होत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

पक्ष संघटन मजबूत करून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत पुढाकार घेत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह निर्माण झाला असून सर्वच कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळेच विविध पक्षातील कार्यकर्ते विशेष म्हणजे युवा वर्ग त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहे. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा शांत आणि संयम स्वभावामुळे ते सर्वांवर भारी पडणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss