Latest Posts

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस २५ वर्ष सश्रम कारावास व एक लाख रुपये द्रव्यदंडाची शिक्षा

– गडचिरोली येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : पोलीस ठाणे गडचिरोली हद्दीतील मौजा गोकुलनगर येथे २७ जानेवारी २०२० रोजी फिर्यादी यांची पीडीत मुलगी (१५) ही काकाचे घरी जेवायला गेली असता पिडीत मुलीचे काका आरोपी शंकर सुधाकर टिंगुसले (३४) रा. विकेकानंद नगर, गडचिरोली याने पिडीतेला सायंकाळी ०६/०० वा दरम्यान मच्छी आणायला बाजारात जाऊ म्हणून फूस लावली व बाजारातुन परत येत असतांना कामगार सोसायटी गोकुलनगरच्या मागे पीडीतेस झाडाझुडपात जोर जबरदस्तीने नेऊन जोर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले, आरोपी याने पिडीतेला कोणाला काही सांगीतले तर तुझ्या आईला, भावाला व तुला जादुटोना करून मारतो अशी धमकी दिली, त्यानंतर २८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०.०० वा पीडीता ही दुकानात जात असतांना आरोपी याने पिडीतेला पाहून तुझ्या आईला काहीतरी सांगायचे आहे. इकडे ये असे बोलुन घरात कोणी नसतांना पिडीतेला घरात ओढत नेउन, तोंड दाबुन जबरदस्तीने शारिरीक संबंध केले व कोणालाही काही सांगितले तर तुला व तुझे भावाला, आईला मारुन टाकीन अशी धमकी दिली. पुन्हा त्याच दिवशी सायंकाळी ०७/०० वा आरोपीच्या पत्नीने पीडीतेला व भावाला जेवायला बोलावून, जेवन करुन झाल्या नंतर आरोपीची पत्नी दुकानात व पीडीतेचा भाऊ घरा बाहेर गेला असता, आरोपी काका याने घरी कोणी नाही याचा फायदा घेउन पिडीचेचा तोंड दाबुन जबरदस्तीने शारिरीक संबंध केले व कोणालाही काही सांगीतले तर तुला व तुझे भावाला, आईला मारुन टाकीन अशी धमकी दिली. फिर्यादी हे नागपुर येथे कामा निमीत्य गेले असता व लाकडाऊन असल्याने कामा वरून दीर्घ कालावधीने परत आल्यानंतर पिडीत मुलगी ही गर्भवती आढळुन आल्याने सदर घटना पिडीतेने फिर्यादीला सांगीतल्याने फिर्यादी यांनी आपले मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल घेत कायदेशिर कार्यवाही होणे करिता पोस्टे गडचिरोली येथे पिडीतेसह येऊन हकीकत सांगितली.

फियादोचे तोंडो रिपोर्ट वरून पोस्टे गडचिरोली येथे ०५ सप्टेंबर २०२० ला अप.क्र. ४०१/२०२० अन्वये कलम ३७६ (२) (एफ), (आय), (जे), ३७६ (३), ५०६ भादवी तसेच सहकलम ४, ५, ६, बाल लैंगीक अत्याचार अधिनियम २०१२, कायदयान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस ०६ सप्टेंबर २०२० रोजी अटक करून, तपास पूर्ण करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. ८६/२०२० नुसार खटला सत्र न्यायालयात चालवुन फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून ०९ मे २०२४ रोजी आरोपी शंकर सुधाकर टिंगसले (३४) रा. विकेकानंदनगर गडचिरोली यास विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, उत्तम एम. मुधोळकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम ३७६ भादवी, सहकलम ४.६ बाल लैंगीक अत्याचार अधिनियम २०१२ मध्ये दोषी ठरवुन २० वर्षे सश्रम कारावास व ७५ हजार रूपये दंडाची शिक्षा, कलम ५०६ भादवी मध्ये दोषी ठरवुन ०५ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला.

सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी बकौल अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास सहा. पोलिस निरीक्षक पुनम प्रकाश गोरे पोस्टे गडचिरोली यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

Latest Posts

Don't Miss