– काँग्रेसचा मतदारांवर पडेल प्रभाव, खा. नेते यांचे पारडं झाले जड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार यांनी आज काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून याबाबत आपल्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली .
यावेळी त्यांनी सांगितले कि गडचिरोली जिल्ह्याच्या स्थानिक उमेदवार म्हणून पक्षाकडे त्यांनी गडचिरोली – चिमूर लोकसभेची तिकीट मागितले आणि पक्षाने मला तिकीट न देता क्षेत्राबाहेरील व्यक्तीला उमदेवारी देऊन स्थानिक आदिवासी नेतृत्वावर अन्याय केला आहे. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेवार, हसन अली गिलानी व काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. नेते यांचे पारडं जड :
माजी आमदार तथा काँग्रेसचे मातब्बर नेते डॉ. उसेंडी यांनी काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने दिल्याने खासदार अशोक नेते यांना होऊ घातलेल्या निवडणुकीत फायदा होईल अशी चर्चा होत आहे.