Latest Posts

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६६ वी जयंती उत्साहात साजरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : १८ एप्रिल २०२४  एस. एन. डी. टी महिला विद्यापीठ, मुंबईच्या महार्षि कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे भारतरत्न महर्षी कर्वे यांचा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून इ.स. १९१० मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली.

इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, इ.स. १९१६ रोजी एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- संस्कृता स्त्री पराशक्तिः अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.

१९२१ साली पहिली महिला या विद्यापीठातुन पदवीधर झाली, ५ विदयार्थीनींनी पासून सुरू झालेल्या विद्यापीठात आज जवळपास ६५,००० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.
या प्रसंगी बल्लारपुर आवरातील सर्व विद्यार्थीनींनी विद्यापीठ गीत सादर केले, आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन केले, सोबतच सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड,  समन्वयक वेदानंद अलमस्त तसेच प्रा. नेहा गिरडकर, प्रा. शित‌ल बिल्लोरे, प्रा. खुशबू जोसेफ, प्रा. अश्विनी वाणी प्रा. श्रृतिका राऊत, ममता भेंडे, वैशाली बोमकंटीवार, आशिष  नुगुरवार, स्नेहा लोहे आणि मनोज अर्गेलवार यांनी  उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss