Latest Posts

IPL च्या इतिहासातील पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत केवळ तीन खेळाडू मैदानावर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (New Delhi) : आयपीएलचा पहिला सामना १८ एप्रिल २००८ रोजी बंगळुरू आणि कोलकाता या संघांमध्ये खेळवण्यात आला होता, तेव्हा कोलकाताचे कर्णधार सौरव गांगुली होते, तर बंगळुरूचे नेतृत्व राहुल द्रविड करत होते.

या सामन्यात खेळलेले विराट कोहली, इशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा या वर्षीही आयपीएलमध्ये खेळत आहेत. विराट कोहली तेव्हाही बंगळुरू संघातच होता आणि आजही तो याच संघात आहे.

ईशांत शर्मा आता दिल्ली संघाकडून खेळत आहे, तर वृद्धिमान साहा यंदा गुजरात संघाकडून खेळत आहे. विराट कोहली यंदा बंगळुरूकडून शानदार कामगिरी करत आहे. त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह आतापर्यंत सर्वाधिक ३६१ धावा केल्या आहेत, तर वृद्धिमान साहाला पाच सामन्यांत केवळ ७८ धावा करता आल्या आहेत. इशांत शर्माने सहा सामन्यांत सहा गडी बाद केले आहेत. या तिन्ही खेळाडूंच्या आयपीएलमधील आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकू या…

विराट कोहली –
सामने : २४४
धावा : ७६२४
शतके : ०८
अर्धशतके : ५२
सर्वोच्च धावसंख्या ११३

इशांत शर्मा –
सामने : १०७
बळी : ८९
पाच बळी : ०१
सर्वोत्तम कामगिरी ५-१२

वृद्धिमान साहा –
सामने : १६६
धावा : २८७६
शतके : ०१
अर्धशतके : १३
सर्वोच्च धावसंख्या ११५

Latest Posts

Don't Miss