Latest Posts

गोंडवाना विद्यापीठ परिसरात इग्नू चे अभ्यास केंद्र कार्यान्वित

– २४ एप्रिल रोजी अभ्यास केंद्राचे होणार उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गोंडवाना विद्यापीठ परिसरात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे (इग्नू) अभ्यास केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या अभ्यास केंद्राचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते २४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन तर मार्गदर्शक म्हणून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, (इग्नू) नागपूरचे विभागीय संचालक डॉ. लक्ष्मण कुमारवाड यांची उपस्थिती असणार आहे.

या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून दुरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, सर्टिफिकेट इन रुरल डेव्हलपमेंट, डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, सर्टिफिकेट इन फूड अँड न्यूट्रिशन, मास्टर ऑफ आर्ट (रुरल डेव्हलपमेंट) आदी अभ्यासक्रम असणार आहे. असे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. प्रीती पुरुषोत्तम पाटील (काळे) यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss