Latest Posts

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक दरम्यान देण्यात आले आरोग्य सेवा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक- २०२४ च्या अनुषंगाने गडचिरोली- चिमुर लोकसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर १९ एप्रिल २०२४ ला गडचिरोली जिल्हयात मतदान झाले आहे.

सदर मतदान केंद्रावर अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय मार्फत औषध किट संवेदनशील क्षेत्रात ४५० आणि साधारण क्षेत्रात ५७२ वितरित करण्यात आले होते. जिल्हयातील अतिदुर्गम भाग व नक्षल प्रभावित असल्याने येथील घात-पात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सध्याच्या वातावरणात झालेली उष्णतेची वाढ लक्षात घेता मतदान केंद्रावरील मतदार व कार्यरत असलेले अधिकारी/कर्मचारी यांच्या करिता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय, गडचिरोली, उपजिल्हा रुग्णालय अहेरी, उपजिल्हा रुग्णालय आरमोरी व उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे Ventilator ची सुविधा तसेच अतिदक्षता विभाग तयार करण्यात आले. या अतिदक्षता विभागात २४×७ सेवा देण्याकरिता एकुण ०४ सर्जन, ३ अम्बिरोग तज्ञ, ४ भूलतज्ञ, ५ भिषक यांची १८ ते २० एप्रिल २०२४ पर्यंत संपुर्ण निवडणुक कालावधीत नेमणूक करण्यात आलेली होती.

सोबत जिल्हयातील कार्यरत ९ ग्रामीण रुग्णालयामध्ये आपातकालीन कक्ष, उष्माघात कक्ष तयार करुन त्यासोबत जिवनावश्यक औषधी आणि प्रशिक्षित मनुष्यबळासह उपलब्ध करण्यात आलेले होते. तसेच व्हि. सी. आयोजित करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अंतर्गत गडचिरोली जिल्हयात रुग्णसेवा देण्याकरिता जिल्हा/महिला व बाल/उपजिल्हा /ग्रामीण रुग्णालयामधील मनुष्यबळामध्ये कार्यरत एकुण वैद्यकीय अधिक्षक १३ तसेच त्यांच्या अधिनस्त सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय न मोडता १८ ते २० एप्रिल २०२४ पर्यंत मुख्यालयी राहून रात्रं-दिवस सेवा दिली आहे. १ बार रुम (Emergency Call Centre) असे सदरच्या कालावधीत २४×७ सेवा देण्याकरिता मुख्यालयी स्थापन करण्यात आले.

यामध्ये उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय येथिल वैद्यकिय अधिक्षक, ४२ वैद्यकीय अधिकारी १६१ अधिपरिचारिका (ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा महिला व बाल/जिल्हा रुग्णालय), ३५ वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके पथक), ४५ औषध निर्माण अधिकारी यांनी आरोग्य मेवा पुरवीली तसेच अहेरी व गडचिरोली येथील रक्तपेढी आणि रक्त साठवणूक केंद्र आरमोरी, कुरखेडा, सिरोंचा, भामरागड या सर्व रुग्णालयात सर्व गटाचे रक्त मुबलक प्रमाणात उपलब्ध केलेले होते आणि ४ रक्त संक्रमण अधिकारी सोबत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी २४×७ कार्यरत होते, तसेच या निवडणूक दरम्यान एकुण १०२ च्या ३८ सुसज्ज रुग्णवाहिका आणि १०८ च्या १० सुसज्ज रुग्णवाहिका कार्यरत होत्या.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक- २०२४ च्या कालावधीत वरील सर्व रुग्णालयामधुन २७ गंभीर रुग्ण भरती करुन उपचार करण्यात आले व इतर किरकोळ आजाराचे मतदार/अधिकारी/कर्मचारी यांच्यावर OPD स्तरावर उपचार करण्यात आले आहे.

जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, गडचिरोली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद बी. खंडाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वरिष्ठ भिषक वर्ग १ डॉ. इंद्रजीत नागदेवते, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. बागराज धुर्वे यांच्या समन्वयाने वरिष्ठ सल्लागार डॉ. अनुपम महेशगौरी व त्यांचे चमू जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गडचिरोली यांच्या नियंत्रण कक्षातील चमू सोबत समन्वय साधून संपूर्ण व्यवस्था यशस्वीपणे राबवीली. सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर कामात योग्य ते सहकार्य केले.

Latest Posts

Don't Miss