Latest Posts

दक्षिण मानेवाडा नागपुरातील सरस्वती नगरात उदयाला हनुमान उत्सवाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : सरस्वती नगर बहुउद्देशीय सेवा संस्था सरस्वती नगर, नागपूरच्या वतीने हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमा उत्सवाचे आयोजन मंगळवार २३ तारखेला करण्यात आले असून सरस्वती नगरातील भक्तांनी हनुमान जन्मोत्सवाचा नगरातील जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.

मंगळवारी सकाळी ६ वा. हनुमान जन्म, सकाळी ७ वा. सरस्वती नगर पुरुष भजन मंडळ, दुपारी २ वाजता हरिओम महिला भजन मंडळ जानकी नगर, आरती व काल्याचे कार्यक्रम आयोजित केला असून २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते १० या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. मंदिरातील रोज सकाळी ८ वाजता व संध्याकाळी ७ वाजता आरती करण्यात येते. आणि महाप्रसादाकरिता भाविकांनी धान्यं गहू, तांदूळ, दाळ, देणगी स्वरूपात मंदिरात स्वीकारल्या जाईल आणि भक्तांनी सरळ हाताने मदत करावी.

विशेष म्हणजे सरस्वती नगरातील सर्व रहिवाशांच्या सहकार्यातून कार्यक्रम होत असून असे, आवाहन कार्यकारणी मंडळांनी तसेच सल्लागार समितीचे देवराव प्रधान यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss